50 ग्रा.पं.चा वीजपुरवठा खंडीत केल्याने शिवसेनेचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 17:48 IST2017-07-27T17:48:19+5:302017-07-27T17:48:39+5:30
चोपडा तहसीलदारांना दिले निवेदन

50 ग्रा.पं.चा वीजपुरवठा खंडीत केल्याने शिवसेनेचा रास्तारोको
ऑनलाईन लोकमत पारोळा, दि.27 - तालुक्यातील 50 गावांच्या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडीत केल्याच्या निषेधार्थ चोपडा तालुका शिवसेनेच्यावतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीने तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे पन्नास गावांच्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्या-त्या गावांना पाणीपुरवठा करणा:या योजना बंद पडल्या आहेत. ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा व वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा यासाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनाची दखल तात्काळ घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती एम. व्ही. पाटील , माजी उपजिल्हा प्रमुख अमृतराव सचदेव, नगरसेवक महेंद्र धनगर, प्रकाश पाटील, राजाराम पाटील, किशोर पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, महेश पवार, दिपसिंग जोहरी, वेले सरपंच ज्ञानेश्वर पाटील, धनराज पाटील, गुलाब कोळी, जगदीश मराठे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.