शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध

By अजय पाटील | Updated: January 1, 2026 13:57 IST

अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. जळगावमध्ये याचा शिंदेसेनेला फायदा झाल आहे.

-अजय पाटील, जळगाव जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरु झाली असून, ३१ डिसेंबर रोजी छाननी प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही माघारीच्या पहिल्याच दिवशी आपलं खातं उघडलं आहे. शिंदेसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे हे देखील बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर होणार आहे. छाननीच्या दिवशी भाजपाच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. 

प्रभाग १८ अ मधून गौरव सोनवणेंचा विजय

आता शिंदेसेनेनेही महापालिकेत धमाकेदार एंट्री केली आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेचे मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

बुधवारपासून (१ जानेवारी) अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी उद्धवसेनेच्या मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या माध्यमातून महापालिकेत शिंदेसेनेने देखील आपले खाते उघडले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP and Shinde's Sena Open Accounts in Jalgaon Municipal Corporation

Web Summary : Following BJP's win, Shinde's Sena also secures a seat in Jalgaon Municipal Corporation. Gaurav Sonawane, son of MLA Chandrakant Sonawane, wins unopposed from Ward 18A after opponent withdrew his nomination.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Jalgaon Municipal Corporation Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा