विकासवाणी, इनरव्हील क्लब यांच्यातर्फे अभिवाचन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:47+5:302021-09-05T04:19:47+5:30

या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेला हा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता, असे आयोजकांनी सांगितले. झूम ...

Advocacy competition on behalf of Vikaswani, Inner Wheel Club | विकासवाणी, इनरव्हील क्लब यांच्यातर्फे अभिवाचन स्पर्धा

विकासवाणी, इनरव्हील क्लब यांच्यातर्फे अभिवाचन स्पर्धा

या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेला हा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता, असे आयोजकांनी सांगितले. झूम मीटिंगच्या स्वरूपात या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दोन तास चाललेल्या या सोहळ्यास सर्व स्पर्धकांसोबतच इनरव्हीलच्या अखिल भारतीय पातळीवरच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, असोसिएशनच्या पदाधिकारी डॉ. रश्मी शर्मा, वीणा स्वामी, मीनल लाठी आणि अन्य पदाधिकारी तसेच विविध भारतीच्या सर्वोत्कृष्ट उद्घोषिका ममता सिंग यासुद्धा उपस्थित होत्या.

परीक्षक म्हणून वीणा स्वामी (चित्रदुर्ग) यांनी इंग्रजी, ममता सिंग यांनी हिंदी आणि सुनीता घाटे व प्रमोद लिमये यांनी मराठी भाषेतील प्रवेशिकांचे परीक्षण केले. हे चौघेही या समारंभास उपस्थित होते.

स्पर्धेत पूजा बवले (मराठी), अनघा रत्नपारखी (हिंदी) आणि मालिनी हेब्बर (इंग्रजी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

समारंभाचे सूत्रसंचालन जुलेखा शुक्ल आणि विकास शुक्ल यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपिका कटारिया यांनी दीपप्रज्वलन, प्रार्थना सादर केल्यानंतर इनरव्हील चाळीसगावच्या अध्यक्ष सीमा शर्मा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. नीता सामंत यांनी आभार मानले.

अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा वाचनाकडे वळता आले आणि आमच्या अंगातील कला दाखविण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले, असा अभिप्राय बहुसंख्य स्पर्धकांनी व्यक्त केला.

Web Title: Advocacy competition on behalf of Vikaswani, Inner Wheel Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.