ईद व आंबेडकर जयंतीनिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना अग्रीम
By सुनील पाटील | Updated: April 12, 2023 19:28 IST2023-04-12T19:28:07+5:302023-04-12T19:28:18+5:30
महापालिकेच्या आस्थापनेवर १०१९ इतके मागासवर्गीय कर्मचारी आहेत. अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांचीही संख्या बऱ्यापैकी आहे

ईद व आंबेडकर जयंतीनिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना अग्रीम
जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदनिमित्त महापालिकेतील मागासर्वर्गीय व अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रति कर्मचारी १२ हजार ५०० रुपये इतके सण अग्रीम बुधवारी देण्यात आले. दीड कोटी रुपयांची रक्कम त्यासाठी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर १०१९ इतके मागासवर्गीय कर्मचारी आहेत. अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांचीही संख्या बऱ्यापैकी आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी १६ मार्च रोजीच महापालिका आयुक्तांना पत्र दिले देऊन ५ एप्रिलपर्यंत अग्रीम देण्याची विनंती केली होती. सण, उत्सवासाठी कर्मचाऱ्याला वर्षातून एकदा सण अग्रीम देण्याची तरतूद आहे. बुधवारी ११०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर १२ हजार ५०० इतकी रक्कम वर्ग केल्याची माहिती आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.