शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पतीच्या संशयी स्वभावाबद्दल अ‍ॅड. राखी पाटील माहिती सांगत, महिला वकिलांनी जागविल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:48 AM

अर्धा दिवस काम बंद ठेवत श्रद्धांजली

जामनेर : सदैव हसतमुख व मनमोकळ्या स्वभाच्या अ‍ॅड. राखी पाटील या त्यांच्या मनातील भावना येथील न्यायालयातील महिला सहकारी वकीलांजवळ बोलून दाखविण्यासह पतीचा संशयी स्वभाव व त्यातून होणारे वाद याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून व्हायचा, असे त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकारी महिला वकीलांनी सांगितले.अ‍ॅड. राखी पाटील यांना जामनेर न्यायालयात बुधवारी सकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व दुपारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी न्यायाधीश एम.एम.चितळे, न्या.सचिन हवेलीकर, न्या.ए.ए.कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील पाटील, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य व न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.अ‍ॅड. राखी पाटील यांनी विवाहानंतर मुलांची कौटुंबीक जबाबदारी सांभाळून सुरुवातीला एल.एल.बी. व नंतर एल.एल.एम. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०११ पासून त्या येथील न्यायालयात प्रॅक्टीस करीत होत्या. आपल्या हसतमुख स्वभावामुळे त्या सर्वांच्या आठवणीत राहिल्या. पतीसोबत त्यांचे वादविवाद होत असले तरी त्यांनी कधीही त्यांच्याबाबत तक्रार केली नाही.राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देता यावी यासाठी त्यांनी पुणे येथे क्लास लावले होते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तत्पूर्वी त्या प्रशिक्षणासाठी नागपूरला दीड महिना होत्या. याकाळात एकदा त्यांच्या मोठ्या मुलाने फोनवरुन पप्पा कुणातरी महिलेला घरी घेऊन आल्याचे सांगितल होते. याबाबतदेखील त्यांनी विषय काढल्याचे त्यांच्या सहकारी महिला वकिलांनी सांगितले.दरम्यान, अटकेत असलेल्या संशयित डॉ.भरत पाटील यांना चौकशीसाठी बुधवारी जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांसह फॉरेंसिक व ठसे तज्ज्ञांनी पाटील यांच्या घरात जाऊन तपासणी केली.घटनेनंतर डॉ.पाटील यांनी ज्या गाडीतून पत्नी राखी यांना बेलवाडी येथे नेले ती गाडी कोण चालवीत होता याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.दरम्यान, घटनेच्या दोन दिवस आधी डॉ.पाटील शहरातील एका खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात नवीन चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांचा संबंधीत कर्मचाºयांशी वाद झाल्याचे समजले. ही चारचाकी ते कुणासाठी घेत होते, याचीही चर्चा शहरात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव