शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यावर कोविड योध्द्यांना प्रशासकीय मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:24 IST

वैद्यकीय अधिकारी बाधित : संपर्काची यादी ग्रुपवर अन् तपासणीला दिरंगाई

जळगाव : कोराना रुग्णांना पती, पत्नी व मुलगा असे तिन्हीजण सेवा देत असतानाच अशा स्थितीत वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या कुटुंबप्रमुखांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले़ यानंतर त्यांना विविध पातळ्यांवर मनस्ताप सहन करावा लागल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे़ सोशल मीडियात संपर्काची यादी व्हायरल झाली. याबाबत वरिष्ठांनी कुठलीही दखल न घेतली गेली नाही.कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांची तपासणी, मार्गदर्शन, औषधोपचार अशी कामे या संकटात करीत असतानाच २४ रोजी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला़ ज्या आरोग्य केंद्रांत इतर कर्मचारी बाहेरून ये-जा करीत होते, हे वैद्यकीय अधिकारी मात्र, पूर्णवेळ क्वार्टरला थांबून सेवा देत होतो़ अशा स्थितीत कोरोनाची लागण झाल्यानंतर मात्र, एकाही वरिष्ठांनी दखल न घेतल्याची खंत तर आहेच मात्र, किमान चांगल्या वागणुकीची अपेक्षा होती, मात्र झाले वेगळेच.एका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी महिला डॉक्टरने आरोग्य विभागाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कातील लोकांची यादीच व्हायरल केली़ या आधी कोणाचेही नाव असे थेट व्हायरल करण्यात आले नव्हते़ कायद्यानेही तो गुन्हा असताना अशा पद्धतीने सोशल मीडियावर नाव उघड झाल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे़ याबाबत आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी संबधित सहाय्यक डॉक्टरची कानउघाडणी केली.पगाराचा धाक...अन् व्याधी असतानाही सेवासंबधित वैद्यकीय अधिकाºयांचे वय ६१ वर्ष आहे. त्यांना उच्च रक्तदाब व उच्च मधुमेह आहे़ अशा स्थितीत ते कोरोनाच्या हायरिस्क रुग्णांमध्ये येतात़ त्या पार्श्वभूमीवर त्यांना गणपती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या सर्व अन्य व्याधी असल्यामुळे कोविडच्या काळात थेट रुग्ण तपासणी टाळावी, असा सल्ला देत कुटुंबियांनी त्यांना थांबाविले होते़ यानंतर हे वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना भेटले व मला दुसरी जबाबदारी द्या, अशी मागणी त्यांनी केली़ मात्र, तुम्हाला पगार मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याने अखेर त्यांनी अशा परिस्थिीतही कोविड सेवा केली व ते स्वत: बाधित झाले़ सुदैवाने त्यांचा मुलगाच गणपती रुग्णालयात कर्तव्यावर असल्याने आईला काहीसा दिलासा मिळाला आहे़तपासणीच्यावेळी ताटकळलेडॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हायरिस्क म्हणून कुटुंबियांनीही स्वॅब घेण्याचे निर्णय घेतला़ यासाठी ते शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात गेले. मात्र, या ठिकाणी अत्यंत वाईट वागणूक त्यांना मिळाली तसेच ९ ते २:३० वाजेपर्यंत त्यांना ताटकळत राहावे लागले़ त्यानंतर त्यांची तपासणी झाली़ ज्या सहकारी डॉक्टरने अहवाल व्हायरल केला ती व महापालिकेत तपासणी करणारे डॉक्टर नातेवाईक असल्याने तिकडे त्यांना कदाचित वरिष्ठांनी खडसावल्याने त्याचा वचपा म्हणून आम्हाला अतिशय उद्धट वागणूक देत पाच ते सहा तास ताटकळत ठेवल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे़संपर्काच्या याद्या पोर्टवलर तातडीने अपडेट कराव्या लागतात़ त्यामुळे अपडेट करणाºया कर्मचाºयाला ही यादी पाठविताना संबधित डॉक्टरकडून चुकून तालुका वैद्यकीय विभागाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर ही यादी सेंड झाली़ मी याबाबत त्यांना बोललो पण त्यांनी अनवधानाने हा प्रकार झाल्याचे मान्य केले़ ही संपर्काची यादी होती़ बाधितांची नावे नव्हती़- डॉ़ संजय चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी, जळगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव