कास्ट्राईबच्या केंद्रीय सहसचिवपदी अडकमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:16 IST2021-03-08T04:16:05+5:302021-03-08T04:16:05+5:30

जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. यात महाराष्ट्र राज्य ...

Adkamol as Castrib's central joint secretary | कास्ट्राईबच्या केंद्रीय सहसचिवपदी अडकमोल

कास्ट्राईबच्या केंद्रीय सहसचिवपदी अडकमोल

जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. यात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत सहसचिव म्हणून आर. एस. अडकमोल यांच्यासह ६ पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर निवड झालेली आहे. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे, केंद्रीय कार्यालयीन सचिव आर.बी रोझदकर, राठोड, विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, जिल्हाध्यक्ष सुनील सोनवणे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

यात आरोग्य कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हाध्यक्षपदी संजय ठाकूर, जिल्हा सचिवपदी मिलिंद लोणारी, विभागीय उपाध्यक्षपदी सुनील निकम, रवींद्र पालवे जिल्हा उपाध्यक्षपदी जे. बी. ननावरे यांची निवड करण्यात आली. १३ मार्च रोजी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हा, तालुका कार्यकारिणीची निवड होणार असल्याचे जिल्हा सचिव मिलिंद लोणारी यांनी कळविले आहे.

Web Title: Adkamol as Castrib's central joint secretary