ऑक्सिजनचा वापर व्यवस्थित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST2021-04-28T04:18:23+5:302021-04-28T04:18:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

ऑक्सिजनचा वापर व्यवस्थित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ऑक्सिजन टॅंकची पाहणी केल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना दिल्या.
डॉ. पाटील यांनी सी टू कक्ष शिवाय कोरोना निदान प्रयोगशाळेचीही पाहणी केली. ही प्रयोगशाळा २४ तास सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे, उपअधिष्ठाता डॉ. विलास मालकर आदी उपस्थित होते.
उपचारांची माहिती
ऑक्सिजनचा पुरवठा नेमका कसा होतो. यासह औषधींचा साठा, उपचार पद्धती याची डॉ. अर्चना पाटील यांनी माहिती करून घेतली. यासह त्यांनी शहरातील कोविड केअर सेंटरचीही पाहणी केली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट घटल्याने त्यांनी प्रशासकीय कामाबद्दल समाधान व्यक्त केले.