राज्यातील आदिवासी विद्यार्थी अद्याप गणवेशविनाच
By Admin | Updated: January 4, 2016 00:35 IST2016-01-04T00:35:29+5:302016-01-04T00:35:29+5:30
शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी यंदादेखील राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना गणवेश मिळाला नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील आदिवासी विद्यार्थी अद्याप गणवेशविनाच
रमाकांत पाटील, नंदुरबार
शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी यंदादेखील राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना गणवेश मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी गेल्या वर्षी मिळालेल्या बिनमापाच्या गणवेशातच सध्या शाळांमध्ये दिसत आहेत.
आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांच्या चर्चा दरवर्षीच रंगतात. शासनातर्फे या विद्याथ्र्याना दरवर्षी दोन गणवेशाचे जोड पुरविण्यात येतात. मात्र गेल्या अनेक वर्षात कधीही वेळेवर ते मिळाले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापूर्वी आघाडीचे शासन असताना तेव्हाच्या आदिवासी विकासमंत्र्यांनी दरवर्षी सुरू असलेल्या गणवेशाच्या तक्रारी कमी करण्यासाठी विद्याथ्र्याच्या बँक खात्यावरच गणवेशाचे पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठेकेदारी लॉबीने चर्चेत असलेल्या या विभागात ते शक्य झाले नाही. याउलट विद्याथ्र्याना व त्यांच्या पालकांचे संयुक्त बँक खाते उघडण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचाही नाहक वेळ गेला. नवीन शासन सत्तेवर आल्यानंतर गेल्या वर्षी या विद्याथ्र्याना ठेकेदाराकडून गणवेश पुरविण्यात आले. परंतु बहुतांश गणवेश विद्याथ्र्याच्या बिनमापाचे होते. शर्ट मोठा तर पॅन्ट लहान किंवा दोघे लहान-मोठे असे होते. काही विद्याथ्र्याना अगदी मापातच येत नसल्याने त्यांनी ते गणवेश परत पाठवले. परंतु त्यांना अद्यापर्पयत ते मिळालेले नाही.
एकीकडे ही स्थिती असताना किमान यंदा तरी चांगले गणवेश विद्याथ्र्याना मिळतील ही अपेक्षा पालक, विद्यार्थी व शिक्षकांना होती. पण दुसरे सत्र सुरू होऊन काही महिने झाले तरी अद्याप गणवेशाची प्रतीक्षा सुरूच आहे. हे गणवेश कधी मिळतील याबाबत अद्याप तरी स्थानिक पातळीवर प्रशासन नेमके सांगू शकत नाही.