शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार

By विजय.सैतवाल | Updated: August 5, 2022 15:00 IST

मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर : शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघाला प्राधान्य

विजयकुमार सैतवाल

जळगाव : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदार संघातच हा कार्यक्रम होणार आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेदरम्यान ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा जळगाव जिल्ह्यातील आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये जळगाव ग्रामीण (धरणगाव तालुका) मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे, मुक्ताईनगर मतदार संघाचे अपक्ष मात्र शिवसेनेसोबत असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. हे बंडखोर आमदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान ते वरील पाच पैकी गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांच्या मतदार संघात क्रांतीदिनीच जनतेशी संवाद साधरणार आहे.   

जळगाव शहरात येऊन एकही कार्यक्रम नाही

आदित्य ठाकरे हे ९ रोजी मुंबई येथून सकाळी जळगाव विमानतळावर पोहचणार आहे. ते जळगाव शहरात येत असले तरी शहरात त्यांचा एकही कार्यक्रम नाही. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात संवाद साधायचा असल्याने भाजप आमदार असलेल्या जळगाव शहराला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. 

आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

- सकाळी १०.१५ वाजता - जळगाव विमानतळावर आगमन. तेथून पाचोराकडे प्रयाण व सकाळी ११.२० वाजता पाचोरा येथे संवाद. - दुपारी १२.१५ वाजता - पाचोरा येथून धरणगावकडे प्रयाण व धरणगाव येथे दुपारी १.४५ वाजता संवाद.- दुपारी २.१५ वाजता धरणगाव येथून पारोळाकडे प्रयाण व दुपारी ३ वाजता पारोळा येथे संवाद. - दुपारी ३.३० वाजता पारोळा येथून धुळ्याकडे प्रयाण.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे