आडगावच्या कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

By Admin | Updated: May 30, 2017 00:54 IST2017-05-30T00:54:27+5:302017-05-30T00:54:27+5:30

पारोळा : अकस्मात मृत्यूची नोंद

Adgaon's loan defaulting farmer: Suicide | आडगावच्या कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

आडगावच्या कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

पारोळा : कर्जबाजारीपणाला  कंटाळून तालुक्यातील आडगाव येथील  येथील पुंडलिक विक्रम पाटील (वय 43) या शेतक:याने  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.
  सकाळी सात वाजेपूर्वी  पुंडलिक पाटील यांनी स्वत:च्या पडीक घरात गळफास घेऊन  आत्महत्या केली.
त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला   होता.
विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 58 हजार, हातउसनवारीचे 65 हजार रुपये आणि इतर बँकांचेही कर्ज त्यांच्यावर होते.
कर्जाचे हप्ते फेडू न शकल्याने त्याच्या जीवनात नैराश्य आले होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
पारोळा येथील कुटीर रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Adgaon's loan defaulting farmer: Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.