आडगाव अंगणवाडीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:46+5:302021-07-10T04:12:46+5:30
चाळीसगाव : चाळीसगावचे बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी नुकतीच आडगाव येथील अंगणवाडीला भेट दिली. यावेळी सरपंच रावसाहेब पाटील, ग्रामसेवक विजय ...

आडगाव अंगणवाडीस
चाळीसगाव : चाळीसगावचे बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी नुकतीच आडगाव येथील अंगणवाडीला भेट दिली. यावेळी सरपंच रावसाहेब पाटील, ग्रामसेवक विजय पाटील, सेविका प्रतिभा पाटील, मदतनीस वंदना पाटील, शिपाई देवचंद पाटील, तुळशीराम रहिले यांनी त्यांचे स्वागत केले.
सोयाबीनवर फिरवला
शेतकऱ्याने रोटाव्हेटर
पथराड, ता. धरणगाव : पथराड परिसरात पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. या वर्षी सोयाबीन बियाणे पेरणी केल्यावर उगवणशक्ती कमी असल्याने एका शेतकऱ्याने त्या सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवला आहे.
शासनाने मदत
करण्याची मागणी
चाळीसगाव : बैल धुण्यासाठी गेलेल्या राकेश चिला अहिरे (२०) हा आतेभाऊ व सुकदेव जगन जाधव (१८) या मामेभावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. या तरुणांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.