मुक्ताईनगरात ३ कोरोना रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:10 IST2020-06-09T19:10:17+5:302020-06-09T19:10:28+5:30

तालुक्यात बाधितांची संख्या ११

Addition of 3 corona patients in Muktainagar | मुक्ताईनगरात ३ कोरोना रुग्णांची भर

मुक्ताईनगरात ३ कोरोना रुग्णांची भर


मुक्ताईनगर : तालुक्यातील कोरोना बधितांची संख्येत ३ ने वाढ झाली आहे. यापूर्वी ८ तर मंगळवारी ३ असे एकूण ११ कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. ११ पैकी १० रुग्ण शहरातील आहेत.
मंगळवारी तालुका आरोग्य विभागाला एकूण ५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४९ निगेटिव्ह तर ३ संशयितांचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तिघे रुग्ण भिलवाडी परिसरातील आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. सदर कर्मचारी वरणगाव येथील रहिवासी आहे. त्याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे नमुने पाठविण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Addition of 3 corona patients in Muktainagar