अडावदला सातव्या दिवशी बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:08+5:302021-09-17T04:21:08+5:30

अडावद पोलिसांनी गणेश मंडळासह गणेशभक्तांना विसर्जन मिरवणूक न काढण्यासह वाद्य न वाजविण्याचे आवाहन केले होते. यास संपूर्ण मंडळांनी व ...

Adavad bids farewell to Bappa on the seventh day | अडावदला सातव्या दिवशी बाप्पाला निरोप

अडावदला सातव्या दिवशी बाप्पाला निरोप

अडावद पोलिसांनी गणेश मंडळासह गणेशभक्तांना विसर्जन मिरवणूक न काढण्यासह वाद्य न वाजविण्याचे आवाहन केले होते. यास संपूर्ण मंडळांनी व गावकरी यांनी १०० टक्के प्रतिसाद देत कुठलेही वाद्य न वाजवता शांततेत विसर्जन केले. दुपारी १२ वाजेपर्यंत सार्वजनिक २८, तर खासगी १२ अशा ४० मंडळांसह घरगुती शेकडोच्या संख्येने असलेले गणरायांना शांततेत निरोप देण्यात आला.

पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा तैनात करण्यात आला होता. चोपड्याचा अतिरिक्त भार असलेले अमळनेरचे डीवायएसपी राकेश जाधव, चोपड्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण अडावदला तळ ठोकून होते. अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि किरण दांडगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, परि.पोउनि. सारिका वाघचौरे, जगदीश कोळंबे, योगेश गोसावी, कादिर शेख, अतुल पाटील, नासिर तडवी, ज्ञानदेव कोळी, रवींद्र कोळी, शरीफ तडवी, कैलास बाविस्कर, जयदीप राजपूत, अक्षय पाटील आदींनी चोख बदोबस्त ठेवला होता.

Web Title: Adavad bids farewell to Bappa on the seventh day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.