‘आदर्श’चे मित्र पळाले शिर्डीला..
By Admin | Updated: October 9, 2015 01:08 IST2015-10-09T01:08:52+5:302015-10-09T01:08:52+5:30
जळगाव : आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श याच्यासोबत जेवायला गेलेल्या त्याच्या सहा मित्रांचा शोध लागला आहे. अपघात झाल्यानंतर आदर्शला मदत न करता ते थेट शिर्डीला पळून गेल्याचे उघड झाले आहे.

‘आदर्श’चे मित्र पळाले शिर्डीला..
जळगाव : आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श याच्यासोबत जेवायला गेलेल्या त्याच्या सहा मित्रांचा शोध लागला आहे. अपघात झाल्यानंतर आदर्शला मदत न करता ते तेथून थेट शिर्डीला पळून गेल्याचे तपासात उघड झाले आहे. गुरुवारी पोलिसांनी त्यांची चौकशी करुन जबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, आदर्शचा अपघात झाल्यामुळे आपणच अडचणीत येवू व आपल्याला त्रास होईल, या भीतीपोटी या सर्वानी तेथून पळ काढल्याचे चौकशीत उघड झाले आहे. बुधवारी पाळधी पोलिसांनी आदर्श व त्याचे मित्र ज्या हॉटेलवर जेवण केले त्या शेरे पंजाब हॉटेलचे मालक, कारागिर, नोकर तसेच जैन इरिगेशन कंपनीचे सुरक्षा रक्षक यांच्यासह नऊ जणांची चौकशी करुन जबाब नोंदविले होते. तपासाधिकारी सहायक निरीक्षक डी.के.ढुमणे यांनी गुरुवारी त्याच्यासोबत असलेल्या सर्व मित्रांचा शोध लावला. मानराज पार्कला झाली भेट आदर्श व त्याच्या सहा मित्रांची घटनेच्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता मानराज पार्कजवळ भेट झाली. हे सर्व जण कारसह थांबलेले होते. तेथे आदर्शने तुषारला तुम्ही येथे काय करताहेत असे विचारले. त्यावर तुषार याने आम्ही सर्व जण पाळधी येथे जेवायला जात असल्याचे सांगितले. आदर्श याने मी पण तुमच्यासोबत जेवायला येतो असे सांगितले. त्यानंतर तो मित्रांसोबत पाळधी येथे गेला. आदर्श हा त्याच्या दुचाकीने तर बाकीचे कारने पाळधीला गेले. हॉटेल शेरे पंजाबला जेवण केल्यानंतर आदर्श त्यांच्या आधी पुढे निघाला. त्यानंतर हे कारने निघाले. आदर्शचा अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे, जीवंत राहण्याची शक्यता नसल्याचे निदर्शनास येताच तेथे न थांबता ते सरळ निघून गेले व नंतर शिर्डीला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तान्या व नीलेश गेले शिर्डीहून जालन्याला घाबरलेल्या अवस्थेत या सर्वानी आपला मोर्चा थेट शिर्डीकडे वळविला. तेथे पोहचल्यानंतर सकाळी तान्याच्या वडिलांनी आदर्शचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना फोनवरुन कळविली. त्यामुळे त्यांच्या मनात आणखीनच भीतीचा गोळा उठला.दुस:या दिवशी तेथून तेजस, नितीन,संघदीप व गणेश हे चाळीसगावला आले तर तान्या व निलेश हे जालन्याला नातेवाईकाकडे गेले. सर्वाची नावे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी त्यांना पाळधी पोलीस दूरक्षेत्रात चौकशीसाठी बोलविले. हे आहेत ते सहा मित्र तपासाधिकारी डी.के.ढुमणे यांनी गुरुवारी सर्व मित्रांचा शोध लावला. त्यात तान्या उर्फ तुषार अजरुन सोनार (वय 22, रामानंद नगर), निलेश अशोक बंडवाल (वय 24, पीडब्ल्युडी क्वॉर्टर), तेजस रमेश बनसोडे (वय 25, वाघ नगर), नितीन सुकलाल अडकमोल (वय 27,पीडब्ल्युडी क्वॉर्टर), संघदीप राजू महाले (वय 25, आदर्श नगर) व गणेश उर्फ यश आदेश कलंत्री (वय 20, अजिंठा हौसिंग सोसायटी) आदींचा समावेश आहे. या सर्वाची चौकशी करुन जबाब नोंदवून घेण्यात आले.