विजय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST2021-06-06T04:12:56+5:302021-06-06T04:12:56+5:30

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथील प्रगतिशील शेतकरी विजय पाटील यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ...

Adarsh Shikshak Puraskar to Vijay Patil | विजय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विजय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथील प्रगतिशील शेतकरी विजय पाटील यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भडगाव येथे पंचायत समितीच्या सभागृहात दि. ४ रोजी लोण पिराचे येथील शेतकरी विजय पाटील यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गौरवचिन्ह, अभिनंदनपत्र व दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी सभापती डाॅ. अर्चना विशाल पाटील, डाॅ. विशाल पाटील, शिक्षण सभापती विकास पाटील, सभापती रामकृष्ण पाटील, बाजार समिती प्रशासकीय संचालक आबासाहेब युवराज पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इमरान सैयद, गटविकास अधिकारी वाघ, तालुका कृषी अधिकारी गोडॆ॔, पं. स. सदस्य रावन भिल, तसेच पं. स. भडगावचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

050621\05jal_1_05062021_12.jpg

===Caption===

विजय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Web Title: Adarsh Shikshak Puraskar to Vijay Patil