पारोळा येथे शिक्षकदिनी आदर्श शिक्षक गुरुजनांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:11+5:302021-09-08T04:21:11+5:30
यावेळी आदर्श शिक्षक सदानंद धडू भावसार, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक रावसाहेब भोसले, महाराष्ट्र राज्य पदवीधर ...

पारोळा येथे शिक्षकदिनी आदर्श शिक्षक गुरुजनांचा सत्कार
यावेळी आदर्श शिक्षक सदानंद धडू भावसार, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक रावसाहेब भोसले, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गिरीष वाणी, एन. ई. एस हायस्कूलचे प्राचार्य पी. के सौंजे, कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मोरणकर, लाड शाखीय वाणी समाज मंडळ अध्यक्ष किरण वाणी, महिला मंडळ अध्यक्ष अंजली श्यामकांत मुसळे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. युगंधरा युथ फाउंडेशन सदस्य नितीन शिनकर, अमोल शिरोळे, भूषण प्रकाश टिपरे, कुशल शिरोळे, सचिन नावरकर या सदस्यांनी स्वखर्चाने आणलेल्या शवपेटीचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दातृत्व संपन्न सदस्यांनी कोरोना काळातदेखील चांगले मदत कार्य केल्याने त्यांचाही यावेळी दत्तलिला बहूद्देशिय संस्थेच्यावतीने अध्यक्ष विजय नावरकर, हेमकांत मुसळे, शरद मेखे, योगेश वाणी, प्रसाद नावरकर, कैलास कोठावदे, सत्यजित शिरोळे, कुंदन अमृतकर, मंगेश शिरोळे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष किरण वाणी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक भाग म्हणून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात समाजात कन्यारत्न होणाऱ्या कुटुंबीयांस अकरा हजार रुपये कन्याभूषण योजना अंतर्गत देण्याचे जाहीर केले.
सूत्रसंचलन शरद मेखे यांनी तर उपस्थितांचे आभार विजय नावरकर यांनी मानले.