कार्यकर्ते पडले तोंडघशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:55+5:302021-07-18T04:12:55+5:30
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. पाच-पंचवीस पदाधिकारी अपेक्षित असताना मात्र शंभरपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. ...

कार्यकर्ते पडले तोंडघशी
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. पाच-पंचवीस पदाधिकारी अपेक्षित असताना मात्र शंभरपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. ते पाहतच पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी वरिष्ठ पातळीवर असे कळवण्यात आले होते की, अमळनेरात विविध आघाड्या स्थापन नाहीत, विश्वासात घेतले जात नाही, मात्र इथे चित्र वेगळेच आहे. असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतही दुसरा गट सक्रिय असल्याचे गुपित उघड केले. आमदारांनी कार्यकर्त्यांना विचारणा केली की, आघाड्या स्थापन नाहीत का? आणि विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या आघाडीच्या याद्याच सादर केल्या. त्यामुळे आदिक यांनी आढावा बैठक आटोपती घेतली. तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आवर्जून बैठकीला पदाधिकाऱ्यांना बोलवल्याने तक्रार करणारे कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले.
- चुडामण बोरसे.