"रेमडीसीवीर"ची जादा दराने विक्री केल्यास कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST2021-03-25T04:16:40+5:302021-03-25T04:16:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. यातच जिल्ह्यात अत्यावस्थ असलेल्या रुग्णांना रेमडीसीवीर दिले ...

Action will be taken if "Remedicivir" is sold at extra rate | "रेमडीसीवीर"ची जादा दराने विक्री केल्यास कारवाई करणार

"रेमडीसीवीर"ची जादा दराने विक्री केल्यास कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. यातच जिल्ह्यात अत्यावस्थ असलेल्या रुग्णांना रेमडीसीवीर दिले जात आहे. मात्र काही औषधविक्रेते हे इंजेक्शन जादा दराने त्याची विक्री करीत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मेडीसीन डीलर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदमध्‍ये दिली. याप्रसंगी पत्रकार परिषदेला सचिव अनिल झंवर, सहसचिव श्रीकांत पाटील, भुसावळ तालुका सहसचिव ईश्‍वर चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातच जिल्ह्यात बाधितांवर उपचार करण्यासाठी बेडच मिळत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अत्यावस्थ झालेल्या रुग्णाला वैद्यकीय अधिकार्‍यांकडून रेमडीसीवीर इंजेक्शन दिले जात आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणाहून या इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. काही दिवसांपूवी जळगाव जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनकडून सामाजिक बांधिलकी जोपासत हे इंजेक्शन १ हजार २०० रुपयांना विक्री करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील काही औषध विक्रेत्यांकडून जादा पैसे घेवून हे इंजेक्शन जादा दराने विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

जादा दराने विक्री करणाऱ्यांची मागविली यादी

आपत्तीच्या काळात औषध विक्रेत्यांनी रेमडीसीवीर जादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेसोबत बैठक घेत जादा दराने विक्री करणार्‍यांची नावे असोसिएशनकडून मागिवली आहे. जे औषध विक्रेते जादा दराने त्याची विक्री करीत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.

तक्रार करता येणार

जे औषध विक्रेते इंजेक्शनची १ हजार २०० रुपयांपेक्षा जादा दराने विक्री करीत आहे. त्यांची तक्रार करण्यासाठी जिल्हा अन्न औषध प्रशासन अधिकारी डॉ. अनिल माणिकराव यांच्याकडे तक्रार दाखल करु शकतात,अशी माहिती सुनील भंगाळे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.

Web Title: Action will be taken if "Remedicivir" is sold at extra rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.