विमा, पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:17+5:302021-07-26T04:15:17+5:30
चाळीसगाव येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे यांच्याकडे आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ...

विमा, पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करावी
चाळीसगाव येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे यांच्याकडे आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यावर तो लवकर बदलून मिळत नाही. त्यामुळे अनेक दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होते. वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे मागतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
त्याचप्रमाणे दूध दरवाढीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गाईचे दूध २७ रुपये तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रतिलिटर भाव शासनाने निर्धारित केले आहे. यापेक्षा कमी दर देऊन फसवणूक करणाऱ्या दूध संघ व दूध संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष पंकज पवार, योगेश वाघ आदींसह पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.