गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:39 IST2019-07-06T15:38:37+5:302019-07-06T15:39:04+5:30
अमळनेर : अंबार्शी टेकडी परिसरात बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणाºया जेसीबी आणि ट्रकवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ६ जुलै रोजी ...

गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
अमळनेर : अंबार्शी टेकडी परिसरात बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणाºया जेसीबी आणि ट्रकवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ६ जुलै रोजी पहाटे अडीच वाजेला कारवाई केली.
तहसीलदारांच्या हालचालींवर पाळत ठेवून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली. देवरे यांनी मोटारसायकलवर येऊन भल्या पहाटे जेसीबी, ट्रक (ढंपर) (एमएच-४२-टी-४०९) या अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई केली आहे. जेसीबीमालक सलीम खान पठाणसह चालक तसेच ट्रकचालकाविरुद्ध तलाठी महेंद्र भावसार यांनी फिर्याद दिली. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुभाष साळुंखे करीत आहेत.