हातभट्टीवर डांगरी येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:52 IST2019-06-16T17:51:28+5:302019-06-16T17:52:02+5:30
२० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त

हातभट्टीवर डांगरी येथे कारवाई
मारवड : येथून जवळच असलेल्या प्र. डांगरी येथे मारवड पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकली. यात २० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली. याबाबत रमेश बंडू वडर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नीलेश शेमडे, हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे, सहाय्यक फौजदार श्रीराम पाटील, सुनील अघुणे यांनी ही कारवाई केली.