बळीराम पेठ भागात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST2021-01-02T04:14:00+5:302021-01-02T04:14:00+5:30

जळगाव : शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, दाणाबाजार भागात शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये ...

Action in Baliram Peth area | बळीराम पेठ भागात कारवाई

बळीराम पेठ भागात कारवाई

जळगाव : शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, दाणाबाजार भागात शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये काही हॉकर्सकडून माल जप्त करण्यात आला. यासह गणेश कॉलनी चौक, महाबळ भागातदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली. आता मनपाने रात्रीच्या वेळेसदेखील कारवाई सुरू केली असून, हातगाडीचालक मनपाच्या रडारवर आहेत.

सुरत रेल्वेगेटवर नित्याचीच वाहतूक कोंडी

जळगाव : शहरातील सुरत रेल्वेगेटजवळ वाहतूक कोंडीची समस्या आता वाढतच जात आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा याठिकाणी वाहतूककाेंडी झाली आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास याठिकाणी अवजड वाहनांनी रस्ता अडविल्याने सुमारे अर्धातास वाहतूककोंडी झाली होती. यामुळे याठिकाणी काही वाहनधारकांमध्ये वाददेखील झाले. याठिकाणी वाहतूक शाखेचा कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Action in Baliram Peth area