अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:02+5:302020-12-27T04:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मानराज पार्कजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी ७ ...

Action against tractor driver transporting sand illegally | अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मानराज पार्कजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी ७ वाजता कारवाई केली. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश पवार आणि संतोष पाटील हे मानराज पार्क परिसरात गस्त घालीत असताना त्यांना एक ट्रॅक्टर (क्रमांक एमएच.१९.पी २८५० आणि ट्रॅली क्रमांक एमएच.१९.एएन.८७०२) वाळूची वाहतूक करताना दिसून आले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालक सागर उल्हास कोळी याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले. ट्रॅक्टर मालक जगदीश सोनवणे यांच्या ट्रॅक्टर मालकीचे असल्याचे समोर आले आहे. पोहेकॉ उमेश पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात चाल‍क सागर कोळी व मालक जगदीश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Web Title: Action against tractor driver transporting sand illegally