३८ वीज चोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:13 IST2020-01-06T22:13:37+5:302020-01-06T22:13:42+5:30

उटखेडा : धडक मोहीम यापुढेही सुरुच राहणार

Action against power thieves | ३८ वीज चोरांवर कारवाई

३८ वीज चोरांवर कारवाई

उटखेडा, ता. रावेर : येथील वीज चोरटयांवर वीज वितरण कंपनीच्या वतीने शुक्रवारी दुपारी कारवाई करण्यात आली. यात अवैधरित्या आकडे टाकणाऱ्या १३ जणांवर तर मिटरमध्ये छोडछाड करणाºया २५ जणांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत वीज चोरीचे साहित्य तसेच मिटर जप्त करण्यात आले. ही कारवाई रावेर विज वितरण कंपनीचे उप अभियंता पी . एस . पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी सहायक उप. अभियंता टी . व्ही . गाजरे , वाय. एल. पाटील, जी . एल. दहिभोत, एस. एम. गुरुकुल, संतोष जाधव, महम्मद अवेश, लिलाधर कोळी, राजू कचरे, किरण पवार, दतात्रय वराळे, गोसावी, कुवर यांनी सहभाग घेतला. शुक्रवारी दुपारच्या वेळेस केलेल्या या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वीज चोरी करणाºयांविरोधात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहातील, असे सहायक उप अभियंता टि .व्ही. गाजरे यांनी सांगितले .

Web Title: Action against power thieves