अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:26+5:302021-06-02T04:14:26+5:30

१ एप्रिल २०२१ या चालू वर्षात आतापर्यंत अवैधरीत्या गौणखनिज चोरणाऱ्या एकूण ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई निंभोरा गावाजवळ १ रोजी ...

Action against 3 tractors transporting sand illegally | अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरवर कारवाई

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरवर कारवाई

१ एप्रिल २०२१ या चालू वर्षात आतापर्यंत अवैधरीत्या गौणखनिज चोरणाऱ्या एकूण ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई निंभोरा गावाजवळ १ रोजी मध्यरात्रीच्या अंधारात अडीच ते तीन वाजेदरम्यान करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त २ लाख रुपये दंडात्मक वसुलीची ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच महसूल प्रशासनाने वाळूची पकडलेली एकूण ३४ वाहने जमा केलेली आहेत.

निंभोरा ग्रामपंचायतीचे पाचोरा प्रांत व तहसीलदारांकडे पत्र

निंभोरा ग्रामपंचायतीने भडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निंभोरा येथील गिरणा नदीपात्रामधील वाळूचोरी रोखण्यात यावी. निंभोरा गावी गिरणा नदीपात्रातील वाळूही अवैधरीत्या सर्रासपणे चोरी होत आहे. ही वाळीचोरी त्वरित रोखण्यात यावी. गावात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. नदीपात्रातून वाळूउपसा झाल्यास अजून पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागेल, असेही पत्रात शेवटी नमूद केले आहे. या पत्रावर सरपंच दिलीप पाटील, ग्रामसेविका सुनीता चौधरी यांची सही आहे.

Web Title: Action against 3 tractors transporting sand illegally