महामार्गावर विनाहेल्मेट धावणाऱ्या १२४२ दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:29+5:302021-02-05T05:56:29+5:30
वाहतूक शाखेला इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनात साडेबारा लाख रुपये किमतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञान ...

महामार्गावर विनाहेल्मेट धावणाऱ्या १२४२ दुचाकीस्वारांवर कारवाई
वाहतूक शाखेला इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनात साडेबारा लाख रुपये किमतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्याद्वारे तीन कि.मी.पर्यंत वाहन डिटेन करता येते. गेल्या वर्षभरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या १ हजार २४२ जणांना या कॅमेऱ्याने कैद केले असून त्यांना ३ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी ५२६ जणांनी २६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१६ दुचाकीधारकांकडे ३ लाख ५८ हजार रुपयांचा दंड प्रलंबित आहे. २०१९ मध्ये ११ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती.
काळ्या काचचा १९ हजार दंड प्रलंबित
कार व इतर वाहनांना काळी काच लावणे कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे, तरी देखील अशा काचचा वापर करणाऱ्या १२१ जणांवर कारवाई करण्यात आली असून १३६ जणांनी २७ हजार २०० रुपये दंड भरला आहे तर ९९ कार चालकांकडे १९ हजार ८०० रुपयांचा दंड अद्याप प्रलंबित आहे. २०१९ मध्ये ३४९ वाहनावर कारवाई झाली होती, त्यापैकी २८५ जणांनी ५७ हजारांचा दंड भरला होता तर ६४ जणांकडे १२ हजार ८०० रुपयांचा दंड प्रलंबित आहे.