दुस:या दिवशीही 32 जणांवर कारवाई
By Admin | Updated: March 10, 2017 00:04 IST2017-03-10T00:04:46+5:302017-03-10T00:04:46+5:30
अमळनेर : प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड, पालिकेच्या कारवाईमुळे अनेकांना भरली धडकी

दुस:या दिवशीही 32 जणांवर कारवाई
अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध नगरपालिकेने दुस:या दिवशीही कारवाई केली. नगरपालिकेच्या कर्मचा:यांनी विविध ठिकाणी छापे टाकून 32 जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्वाना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पालिकेच्या कर्मचा:यांनी गुरुवारी तांबेपुरा, सानेनगर, ख्वॉजानगर, सुभाष चौक, आठवडे बाजार, कसाली मोहल्ला, चोपडा नाका, शिवाजीनगर, पैलाड, गांधलीपुरा परिसरात छापे टाकले. त्यात उघडय़ावर शौचास बसणारे हरीश टालवाले, अतुल वाघ, रंगराव पाटील, आकाश पाटील, धर्मा पांचाळ, संजय पांचाळ, रामलाल पाटील, संजय पाटील, संजय सीताराम पाटील, सुनील पाटील, बापू पाटील, सुधाकर पाटील, भिकन पाटील, मुस्तफा खान, दत्तू भिल, दादाभाऊ, पाटील, आबा पाटील, रमेश परदेशी, आशिक विश्वकर्मा, सरवण विश्वकर्मा, मुरली विश्वकर्मा, रोहिदास पवार, बन्सीलाल साळुंखे, शेख मोहम्मद शेख अमर, अशोक कोळी, कलीम शेख अयुब, विष्णू लांडगे, हैदरखॉँ पठाण, देवीदास काटे, प्रवीण पाटील, अमृत सूर्यवंशी, जाधव यांना पकडले. या सर्वाविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस कायदा 115, 117 प्रमाणे गुन्हे दाखल केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वहाब सैयद यांनी प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सायंकाळी पाचनंतर दंड भरल्यानंतर सर्वाची मुक्तता केली. माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे, अरविंद कदम, अभियंता सचिन गवांदे, संजय पाटील, जनार्दन येवले, नागेश खोडवे, भाऊसाहेब पाटील, विजय बागुल, ज्ञानेश्वर संदानशिव, गोपाल गजरे, अशोक बि:हाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी हजर होते. (वार्ताहर)
दोघांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की ते दंड भरू शकत नव्हते. अखेरीस पोलीस, पत्रकार व इतर सहका:यांनी मदत केल्याने त्यांचीही सुटका झाली.