मंजुरी प्रमाणे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:02+5:302021-05-05T04:26:02+5:30
गणेश महाले यांची निवड जळगाव : ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश भिवसन महाले यांची नियुक्ती करण्यात ...

मंजुरी प्रमाणे काम करा
गणेश महाले यांची निवड
जळगाव : ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश भिवसन महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, महासचिव राजेश आंधळे यांनी या नियुक्तीचे पत्र दिले. या निवडीचे महाराष्ट्र अध्यक्ष विद्या गडाख, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप सुरडकर यांनी स्वागत केले आहे.
पथदिवे बंद
जळगाव : रामानंद नगर परिसर ते श्रीधर नगर रस्ता यादरम्यानचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा रस्ता रामानंद घाटाचा असून मोठा उतार आहे. या ठिकाणी अंधार पसरलेला असल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे पथदिवे तात्काळ सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
सकाळी संसर्गाची अधिक भीती
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते अकरा या वेळेत असल्याने याच काळात बाजारपेठेत अधिक गर्दी वाढत आहे. दररोज होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू पाहात आहे. यंत्रणांनी भाजी बाजार व दुकानांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना लस द्या
जळगाव : स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. शहर तसेच तालुक्यातील १०५ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार असून प्रत्येक दुकानात पाचशे ते हजार शिधापत्रिकाधारक आहेत. कोरोनाचा वाढत्या संसर्ग पाहता सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना लसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.