टिटवी येथील महिलेचा खून करणा:या आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 17:08 IST2017-05-04T17:08:44+5:302017-05-04T17:08:44+5:30

पारोळा तालुक्यातील टिटवी येथील महिलेच्या खूनप्रकरणातील आरोपी सुखराम ज्योतीराम भिल (टिटवी) यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

The accused, who was murdered by a woman in Titvi, is a life imprisonment | टिटवी येथील महिलेचा खून करणा:या आरोपीस जन्मठेप

टिटवी येथील महिलेचा खून करणा:या आरोपीस जन्मठेप

 अमळनेर, दि.4- पारोळा तालुक्यातील टिटवी येथील महिलेच्या खूनप्रकरणातील आरोपी सुखराम ज्योतीराम भिल (टिटवी) यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज दिला. 

 सुमनबाई गुलाब  भिल ही महिला  25 नोव्हेंबर 2015 रोजी  आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी दोन-अडीच  वाजेच्या सुमारास गावातील आरोपी सुखराम भिल याने त्या महिलेला लाकडी दांडय़ाने मारहाण करीत तिचा गळा आवळला. जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. 
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्या. कोठलीकर यांनी आरोपी सुखराम भिल यास जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. (वार्ताहर)

Web Title: The accused, who was murdered by a woman in Titvi, is a life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.