लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST2021-05-31T04:13:08+5:302021-05-31T04:13:08+5:30

येथील उज्ज्वल कॉलनी भागातील रहिवासी १६ वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून, भडगाव पोलीस स्टेशनला स्वप्नील ऊर्फ ...

Accused of sexual assault and rape remanded in judicial custody | लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयीन कोठडी

लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयीन कोठडी

येथील उज्ज्वल कॉलनी भागातील रहिवासी १६ वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून, भडगाव पोलीस स्टेशनला स्वप्नील ऊर्फ कोमल जगन्नाथ पाटील (२६) या तरुणाविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२)(आय)(एन), ३५४(ड), ५०६ सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा २०१२चे कलम ३(अ), ४ प्रमाणे दि. २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी हा २०१७ पासून तिचा पाठलाग करून तिच्यासोबत प्रेमसंबंध तयार केले होते. आई-वडील घरी नसताना तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला व वेळोवेळी त्याचे मोबाइलमध्ये काढलेले फोटो दाखवून धमकावून फिर्यादीच्या भावास जिवे ठार मारण्याची तसेच काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

Web Title: Accused of sexual assault and rape remanded in judicial custody