बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:00 IST2017-01-24T01:00:02+5:302017-01-24T01:00:02+5:30

नंदुरबार : सोनखडका येथील घटना

The accused for seven years' rigorous imprisonment for rape | बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी

नंदुरबार : लगAाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणा:या फिलीप वंजी गावीत (रा. सोनखडका, ता. नवापूर) यास            सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
   जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी सोमवारी हा निकाल दिला.
वैद्यकीय अहवाल व इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून फिलीप यास सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, कलम 417 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीलेश बी. देसाई यांनी काम पाहिले.   
अल्पवयीन मुलगी सुटीनिमित्त एप्रिल व मे 2010 मध्ये सोनखडका येथे गावी आली होती. या दरम्यान तिला घराशेजारीच असणारा फिलीप वंजी गावीत याने लगAाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि या दोन महिन्यात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर फिलीप याने लगAास नकार दिला.
याप्रकरणी मुलीने नवापूर पोलीस ठाण्यात फिलीप याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: The accused for seven years' rigorous imprisonment for rape