यावल दरोड्यातील आरोपीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST2021-08-01T04:17:28+5:302021-08-01T04:17:28+5:30

भुसावळ : यावल येथील सराफ दुकानावरील दरोडा प्रकरणातील आरोपी मुकेश प्रकाश भालेराव (२६, बोरावल खुर्द, ता. भुसावळ, ...

The accused in the robbery | यावल दरोड्यातील आरोपीचा

यावल दरोड्यातील आरोपीचा

भुसावळ : यावल येथील सराफ दुकानावरील दरोडा प्रकरणातील आरोपी मुकेश प्रकाश भालेराव (२६, बोरावल खुर्द, ता. भुसावळ, ह.मु. राहुल नगर, तापी नदी पुलाजवळ, भुसावळ) याला भुसावळ पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.

यानंतर त्याने तालुका पोलीस ठाण्यातील शौचालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफ दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता. यात मुकेश भालेराव यास तालुका पोलिसांनी एका गुन्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. यानंतर त्याने शौचालयात जाऊन तेथील खिडकीच्या तुटलेल्या काचेच्या साहाय्याने पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूस तसेच छाती व दोन्ही मांडीवर दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच काचेचा तुकडा शौचालयाच्या भांड्यात फेकून दिला. त्याला लागलीच भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. हवालदार प्रवीण युवराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

फोटो नंबर

०१ आरएमएम २२

Web Title: The accused in the robbery