जुन्या वादावरून मारहाणप्रकरणी आरोपीस ७ वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:58 IST2019-07-11T20:58:11+5:302019-07-11T20:58:15+5:30

अमळनेर : आधीच्या वादावरून चोपडा येथील एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा न्यायधीश ...

The accused has been sentenced to seven years imprisonment | जुन्या वादावरून मारहाणप्रकरणी आरोपीस ७ वर्षे कारावास

जुन्या वादावरून मारहाणप्रकरणी आरोपीस ७ वर्षे कारावास



अमळनेर : आधीच्या वादावरून चोपडा येथील एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा न्यायधीश राजीव पांडे यांनी आरोपीस सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा येथील अशोक माळी यांच्यावर ९ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपी बाळू उर्फ भरत भागवत मराठे रा. सिद्धिविनायक कॉलनी, चोपडा याने चाकूने वार केले होते. चोपडा कॉलेज रोडवर १ आॅक्टोबर २०१७ रोजी अंडाभुर्जी खाऊ न घातल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत चाकूने पोटावर, गळ्यावर, तोंडावर व कपाळावर वार करून माळी यास गंभीर जखमी केले होते. याबाबत प्रदीप अशोक माळी याने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात सरकारी वकील किशोर बागुल यांनी १० साक्षीदार तपासले. त्याअनुषंगाने जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे यांनी आरोपीस दोषी ठरवत ७ वर्र्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: The accused has been sentenced to seven years imprisonment