दीपनगर प्रकल्पातील बोगस भरतीप्रकरणी आरोपीला कोठडी
By Admin | Updated: May 16, 2017 17:25 IST2017-05-16T17:25:58+5:302017-05-16T17:25:58+5:30
19 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ या गुन्ह्यात एकूण 13 आरोपी आहेत़

दीपनगर प्रकल्पातील बोगस भरतीप्रकरणी आरोपीला कोठडी
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 16 - दीपनगर प्रकल्पात बोगस नियुक्तीपत्रे तयार करून भरती केल्याप्रकरणी गुरनं़15/17 मधील मुख्य आरोपी तथा अपर विभागीय लिपीक योगेश उर्फ बबलू बापू पाटील (वय 35, दीपनगर) यास तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात न्या़ पी़ बी़ वराडे यांच्यापुढे हजर केले असता 19 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ या गुन्ह्यात एकूण 13 आरोपी आहेत़ सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड़नितीन खरे यांनी युक्तीवाद केला़