आरोपी डॉक्टरला २० पर्यंत पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:34 IST2019-01-16T13:32:19+5:302019-01-16T13:34:05+5:30
महिला वकिलाचा खून प्रकरण

आरोपी डॉक्टरला २० पर्यंत पोलिस कोठडी
जामनेर : सहाय्यक सरकारी वकील विद्या राजपूत यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला पती डॉ.भरत पाटील याला २० पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांच्यासमोर संशयित आरोपी डॉ. भरत पाटील याला मंगळवारी हजर करण्यात आले. सरकारी वकील अॅड.कृतिका भट व अॅड.अनिल सारस्वत यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली. भरत पाटील यांना पोलिसांनी न्यायालयात आणल्यानंतर तो सरकारी वकिलांच्या कक्षाबाहेर रडत होता.
चौकशीसाठी मंगळवारी फॉरेंसीक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांसह ठसेतज्ज्ञ व डॉक्टरांच्या पथकाने जामनेर येथील डॉ.भरत पाटील यांच्या घरी जाऊन तपास केला. निरीक्षक प्रताप इंगळे त्यांचे सोबत होते.
वकीलपत्रास ना
या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील वकील संघाने केली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपींचे वकिलपत्र कुणीही घेऊ नये असा ठराव करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी १६ रोजी वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.सुनील पाटील, व अॅड.ज्ञानेश्वर बोरसे यांनी दिली.