लोकमत न्यूज नेटवर्कपथराड ता. धरणगाव : येथून जवळच एकलग्न येथे गतीमंद मुलगीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाली.गल्लीत खेळत असलेली ही मुलगी आजीबाई यांनी गल्लीत पाहिले असता ती मुलगी आजीला गल्लीत दिसली नाही. लगेच आजीने मुलीच्या वडिलांना सांगितले की, तुझी मुलगी गल्लीत खेळत होती पण दिसत नाही.यावेळी वडिलांनी गावात शोध घेतल्यावर मुलगी कुठेच दिसली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी पाळधी पोलिसांना मुलगी गल्लीतून बेपत्ता झाल्याची खबर दिली व गावातील रमेश मंगा कळसकर यांच्या घरातून ती गतीमंद मुलगी रडत बाहेर येत असताना लोकांनी पाहिले.तिला तिच्या घरी सोडल्यावर वडिलांनी मुलीला सोबत घेत पाळधी पोलिसांना माहिती दिली. नंतर पाळधी पोलिसांनी लगेच आरोपी रमेश मंगा कळसकर (३२) याला अटक केली. यावेळी मुलींच्या वडिलांनी पाळधी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. यावेळी पाळधी पोलिसांनी रमेश कवसकरला अटक करून मुलीला जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्या मुलीची तब्येत बरी असल्याचे सांगितले. याविषयी पाळधी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड पुढील तपास करत आहे. याविषयी जिल्हा रूग्णालयातील कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.
एकलग्न येथे गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 22:59 IST
एकलग्न येथे गतीमंद मुलगीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाली.
एकलग्न येथे गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
ठळक मुद्दे मुलगी रडत घराबाहेर आली, अन उलगडा झालाआरोपीला अटक