अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:17+5:302021-03-04T04:29:17+5:30
जळगाव : उमाळा घाटात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघात प्रकरणी एमएच ४१ एयू १८०७ या ट्रक चालकाविरुध्द मंगळवारी एमआयडीसी ...

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : उमाळा घाटात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघात प्रकरणी एमएच ४१ एयू १८०७ या ट्रक चालकाविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री हा अपघात झाला होता. त्यात डिगंबर रामरास भोसले व नम्रता रामेश्वर चौधरी (रा. वाकोद, ता.जामनेर) दोन जण ठार झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.
कुसुंबा येथून दुचाकी चोरी
जळगाव : कुसुंबा येथील तुळजाई नगरातून मनोज संतोष पवार (२५) या तरुणाची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच १९- बीझेड ६७३४) चोरट्यांनी लांबविल्याची घटना १ मार्च रोजी उघड झाली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गणेश शिरसाळे करीत आहे.