भुसावळच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 2, 2017 10:39 IST2017-07-02T10:39:03+5:302017-07-02T10:39:03+5:30

रेल्वेच्या पंधरा बंगला भागातील रहिवासी सोनू बाळू चौधरी (वय 25) या तरुणाचा पुण्यात खासगी कंपनीत डय़ूटीवर असताना खाली पडून मृत्यू झाला.

Accidental death of Bhusawal's youth in Pune | भुसावळच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

भुसावळच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

 ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.2 - शहरातील  रेल्वेच्या पंधरा  बंगला भागातील रहिवासी सोनू बाळू चौधरी (वय 25) या तरुणाचा पुण्यात  खासगी कंपनीत डय़ूटीवर असताना खाली पडून मृत्यू झाला. ही घटना 30 रोजी पुण्यात सकाळी 9-10 वाजता घडली. 
सोनू याच्या आप्तेष्ठांच्या माहितीनुसार तो पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस होता. तो डय़ूटी करीत असताना अचानक वरून खाली पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे आज पहाटे 4 वाजता निधन झाले. त्याचे वडील बाळू चौधरी हे रेल्वे कर्मचारी आहेत. सोनूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, वहिनी असा  परिवार आहे. रात्री उशीरा त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
विहिरीत पडला तेव्हा आईने वाचविले होते प्राण
सुमारे 10 वर्षापूर्वी सोनू चौधरी हा  घराजवळील विहिरीत पडला होता. त्या वेळी त्याची आई मंगला हिने विहिरीत उडी घेऊन त्याचे प्राण वाचविले होते. मात्र, अखेर मृत्यूने त्याला गाठलेच. कंपनीत नोकरी करीत असताना तो पडून मरण पावला. 

Web Title: Accidental death of Bhusawal's youth in Pune