नागेश्वर येथे दर्शनासाठी फरशीवरून जाताना अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:14+5:302021-09-07T04:20:14+5:30

बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे बोरी ...

Accident while walking on the floor for darshan at Nageshwar | नागेश्वर येथे दर्शनासाठी फरशीवरून जाताना अपघात

नागेश्वर येथे दर्शनासाठी फरशीवरून जाताना अपघात

बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. श्री तीर्थक्षेत्र नागेश्वर रस्त्यावरील फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ६ रोजी सकाळी १० वाजता सोमवती अमावस्या निमित्ताने भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी नागेश्वर येथे जात होते; परंतु पुलावरून खूप पाणी वाहत असल्याने भाविकांनी रस्त्याच्या कडेला आपली वाहने लावून पाण्यातून पायी जात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी वाट निवडली. दर्शन घेऊन परत येत असताना पारोळा येथील न्यू बालाजी नगर येथील रहिवासी विजय जीवन पाटील आणि त्यांचा मुलगा प्रवीण विजय पाटील यांचा पाय घसरला. विजय जीवन पाटील हे पुलावरून खाली पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहात ते फरशी पुलाच्या पाईपमध्ये अडकले. त्याचवेळी उंदिरखेडे येथील तरुण कल्पेश विठ्ठल शिंदे,गणेश बुधा पाटील,सागर शेषराव शिंदे आणि दोन भिल्ल समाजातील २ युवकांनी त्यांना मोठ्या शिताफीने त्या पाईपातून बाहेर काढले तोपर्यंत विजय पाटील यांच्या छातीत पाणी गेल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यांच्या छातीतून पाणी काढून तरुणांनी त्यांना प्रथमोपचार दिले आणि खासगी वाहनाने पारोळा येथे उपचारासाठी रवाना केले. या कार्यामुळे उंदिरखेडे येथील विजय पाटील यांचे प्राण वाचले. या सर्व तरुणांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.विजय पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

छाया--फरशीचा काही भाग पाण्यात वाहून गेला तर काही भाग पाण्याखाली आला.याच फरशीवर विजय पाटील यांना अपघात झाला.

Web Title: Accident while walking on the floor for darshan at Nageshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.