पहूननजीक अपघातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:47+5:302021-07-10T04:12:47+5:30

जामनेर, जि. जळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार पोलीस कर्मचारी जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ...

In an accident near Pahun | पहूननजीक अपघातात

पहूननजीक अपघातात

जामनेर, जि. जळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार पोलीस कर्मचारी जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना जळगाव - जामनेर रस्त्यावर पहूरनजीक गुरुवारी रात्री ११.३० वाजता घडली. मधुकर चिंधू सोनवणे (३२, रा. पहूर, ता. जामनेर) असे या मृत पोलिसाचे नाव आहे. या अपघातात नीलेश शालीग्राम कुमावत (२३) हा जखमी झाला आहे.

मधुकर सोनवणे हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. पहूर पेठमधील रहिवासी असलेला मधुकर सोनवणे व पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. तो व त्याचा मित्र नीलेश कुमावत हे दोघे जामनेरहून गुरवारी रात्री पहूरकडे येत होते. पहूरनजीक रेल्वे क्राॅसिंगजवळ अज्ञात वाहनाचा व दुचाकीचा (एमएच १९ सीए ३६९९) अपघात झाला. यात मधुकर हा जागीच ठार झाला. गावातीलच शुभग लादे हा रात्री तिरुपती जिनिंगमध्ये प्रवेश करीत असताना त्याला मोठा आवाज ऐकू आला. त्याने लागलीच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी मधुकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर दुसरा नीलेश कुमावत गंभीर असल्याचे आढळले. त्याने गावातील मित्रांना फोन करून ही अपघाताची माहिती दिली. यानंतर जवळपास दोन तासांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका लवकर आली असती तर कदाचित मधुकरचे प्राण वाचू शकले असते.

रात्रीची वेळ असल्याने येणारी- जाणारी वाहनेही थांबत नव्हती.

Web Title: In an accident near Pahun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.