शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

धानोरा-पंचक दरम्यान अपघात- एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:16 AM

दारुच्या नशेत मोटारसायकल स्वारास उडवले

बिडगाव, ता.चोपडा : अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावरील धानोरा-पंचकदरम्यान एका चारचाकी गाडीने मोटारसायकल स्वारास उडवले. यात एक जण जागीच ठार झाला. दरम्यान चारचाकी गाडीतील चालकासह दोघांना पूर्णत: दारुची झिंग चढलेली होती. यावेळी घटनास्थळी जमलेल्या संप्तत जमलेल्या जमावाने अपघातातील गाडी पेटवुन दिली.याबाबत सविस्तर असे की, येथुन जवळच असलेल्या बिडगाव येथील प्रगतशिल शेतकरी विश्वास आत्माराम पाटील (वय ५५) हे खाजगी कामानिमित्त अडावद येथे गेले होते. तिकडून घराकडे परत येताना धानोरा-पंचक दरम्यान असलेल्या गवळी नाल्याजवळ संध्याकाळी सातच्या सुमारास मोटारसायकलला क्र.एमएच-१९-सीए-७६४६ आणि धानोराकडून जाणाऱ्या कारने एमएच-१२-एमएफ-५२१६ जोराने धडक दिली. यात मोटारसायकल वर असलेले विश्वास पाटील हे जागीच ठार झाले. अपघातातील कारमध्ये असलल्या दोन जणांपैकी एक जण पळून गेला तर दुसरा उमेश अनिल पाटील यातील एकास जमावाने थेट पोलिस ठाण्यात पोहचविले. दरम्यान गाडीत दारुच्या बाटल्या दिसल्याने जमाव आधिकच भडकला होता. पण वेळीच घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, ए.एस.आय जगदिश कोळंबे हे पोहचत महामार्गावरील वाहतुक सुरळीत करुन जमावाला शांत केले. यात उमेश अनिल पाटील यास ताब्यात घेतले असुन एक जण फरार झालेला आहे. यातील दोघेही जण चोपडा तालुक्यातील नामांकीत राजकीय परीवाराचे असल्याचे समजते.विश्वास पाटील यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क असल्याने घटनास्थळी धानोरा, बिडगाव, पंचक, मोहरद, लोणी अडावद, खर्डी, वरगव्हानसह अनेक गावातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दारु पिऊन गाडी चालवली व गाडीत ही दारूच्या बाटल्या दिसल्याने संतप्त जमावाने थेट गाडी पेटवली. यात वेळीच अडावद पोलिसांनी, होमगार्ड व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती.चौघांनी दारू रिचवलीघटनास्थळावरुन काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर चार जणांनी येथेच्छ दारु रिचवली. जेवणाचे लावलेले टेबल अपूर्ण सोडून हॉटेलवरुन काढता पाय घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. यात मात्र दोन जण मोटारसायकलवर व दोन जण आरटिका गाडीत निघाले. यात हॉटेलवरील बिलही न देताच निघाल्याने सुसाट गाडी पळवत मोटारसायकलला धडक दिली, अशी माहीतीही समजली.