धुळे-चाळीसगाव महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:28 IST2019-12-30T22:28:23+5:302019-12-30T22:28:31+5:30

मेहुणबारे, ता.चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे महामार्गावर नवे दसेगाव फाट्यावर सोमवारी पहाटे टेम्पो व डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ...

Accident on Dhule-Chalisgaon Highway | धुळे-चाळीसगाव महामार्गावर अपघात

धुळे-चाळीसगाव महामार्गावर अपघात



मेहुणबारे, ता.चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे महामार्गावर नवे दसेगाव फाट्यावर सोमवारी पहाटे टेम्पो व डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांमधील दोन जण जखमी झाले. तर दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.
चाळीसगाव-धुळे महामार्गावर ३० रोजी पहाटे ४.३० ते ४.४५ वाजेच्या दरम्यान नवा दसेगाव फाट्यावर ढेप घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या एमएच ०४, सीयू २५३६ या टोम्पोची चाळीसगावकडे येणाºया एमएच ३६ एफ १००१ या डंपरशी समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये टोम्पोमधील दोन जण जखमी झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात आयशरवरील संजय जानकीराम सुळद व राजू दगडू जंगले (रा.पिशोर,ता.सिल्लोड,जि.औरंगाबा) हे जखमी झाले. त्यांना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. परंतु तब्बल साडेदहा वाजता वाहतूक सुरळीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

Web Title: Accident on Dhule-Chalisgaon Highway