शिरसोलीत लसीकरणाला वेग; दहा हजार लोकांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:15+5:302021-09-19T04:17:15+5:30
शिरसोली प्र.बो. येथे जिजामाता कन्या माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता कन्या विद्यालयात म्हसावद आरोग्य केंद्रांतर्गत ...

शिरसोलीत लसीकरणाला वेग; दहा हजार लोकांचे झाले लसीकरण
शिरसोली प्र.बो. येथे जिजामाता कन्या माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता कन्या विद्यालयात म्हसावद आरोग्य केंद्रांतर्गत १८ सप्टेंबर रोजी दोन हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. ही लस घेण्यासाठी नागरिकांनी शाळेत गर्दी केली होती. येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाला लस मिळावी, यासाठी ग्रामपंचायत व जिजामाता शाळेच्या शिक्षकांनी योग्य नियोजन करून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या दोन हजार लसींमुळे शिरसोली प्र. बो. व प्र. न. या दोन्ही गावातील पहिला व दुसरा असे दहा हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेवर तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण, म्हसावद विभागाचे आरोग्य कर्मचार्यांनी सात बुथ तयार करून लसीकरण केले. लसीकरण शांततेत, सुरळीत पार पडावे, यासाठी सरपंच प्रदीप पाटील, पंचायत समिती माजी सभापती नंदलाल पाटील, जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शाळेचे अध्यक्ष जगतराव पाटील, प्रमोद पाटील ,सुधाकर पाटील, प्रवीण पाटील, पोलीस पाटील शरद पाटील, ग्रामपंचायत लिपिक तुषार अस्वार, मुरली ढेंगळे व नीलेश भारुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शाळेचे शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.