भडगाव तालुक्यात शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 04:29 PM2019-11-25T16:29:57+5:302019-11-25T16:31:05+5:30

यंदा अवकाळी पावसात अतोनात नुकसान झालेल्या खरीप हंगामाच्या पिकांच्या काढणीचे काम करताना शेतकरी नजरेस पडत आहेत.

Accelerate agricultural work in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यात शेती कामांना वेग

भडगाव तालुक्यात शेती कामांना वेग

Next
ठळक मुद्देतीन तेरा झालेल्या खरीप हंगामाची अशीही काढणीमजुरांची टंचाई

भडगाव, जि.जळगाव : यंदा अवकाळी पावसात अतोनात नुकसान झालेल्या खरीप हंगामाच्या पिकांच्या काढणीचे काम करताना शेतकरी नजरेस पडत आहेत. सध्या शेती कामांना वेग आला आहे. त्यात मजुरांची टंचाई भासत आहे. चांगले उत्पन्न तर हातचे गेले. पावसाने खराब व कणसातील दाण्यांतून उगवलेले कोंब या स्थितीतले मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची काढणी मळणी यंत्रांवर होताना दिसत आहे. कापूस वेचणीचेही काम सुरू आहे. अशी तालुक्यातील तीन तेरा झालेल्या खरीप हंगामाच्या पिकांची शेतकरी जे उत्पन्न निघेल त्या आशेने समाधान मानत कामाला लागल्याचे दिसत आहे.
भडगाव तालुक्यात यावर्षी एकूण ४२ हेक्टर क्षेत्राच्या जवळपास शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिक पेरणी व लागवड केलेली होती. यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, भुईमुग यासह पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी वा लागवड केलेली होती. चांगल्या पावसाने शेती पिके बहरत शेतकºयाने मेहनत व कष्टाने शेती हंगाम बहरवला होता. यावर्षी खरीप हंगाम चांगले उत्पन्न साधेल अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सततच्या अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने शेतमाळरानात जमिनीवर कापून पडलेली ज्वारी, मका, बाजरी कणसांना तर सोयाबीनच्या शेंगांना दाणे फुटून नुकसान झाले. कपाशीच्या झाडावरील कापूस बोंडातील सरकीही ओलाव्यामुळे कोंब फुटून तर कुठे, फुलफुगडी गळती, परिपक्व कैºया सडून मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा खरीप हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार महसुल व कृषी प्रशासनाने तालुक्यातील एकूण ३५ हजार ८०७, २८ हेक्टर बाधीत क्षेत्राचे पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात तीन तेरा झालेल्या खरीप हंगामाच्या पिक काढणीचे कामे वेगात रानोमाळ सुरू असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
 

Web Title: Accelerate agricultural work in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.