‘अब्राह्मणी योद्धा कॉ. शरद पाटील’ ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:00+5:302021-08-23T04:20:00+5:30
जळगाव : कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयातील डॉ. प्रकाश कांबळे लिखित व लोकायत प्रकाशन प्रकाशित ‘अब्राह्मणी योद्धा कॉ. ...

‘अब्राह्मणी योद्धा कॉ. शरद पाटील’ ग्रंथाचे प्रकाशन
जळगाव : कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयातील डॉ. प्रकाश कांबळे लिखित व लोकायत प्रकाशन प्रकाशित ‘अब्राह्मणी योद्धा कॉ. शरद पाटील’ या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व लेखक मा. प्रा. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रख्यात साहित्यिक व प्रखर विचारवंत डॉ. यशवंत मनोहर व प्रसिद्ध लेखिका नजूबाई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ. यशवंत मनोहर यांनी 'अब्राह्मणी योद्धा कॉ. शरद पाटील’या ग्रंथाबद्दल सविस्तर विवेचन केले. नजूबाई गावित यांनी वर्तमानात जात अधिक तीव्र होत आहे. गुलामी नवे रूप धारण करत आहे. अशावेळी कॉ. पाटलांनी दिलेला विचार अधिक सोपा करत लोकांसमोर घेऊन गेले पाहिजे असे सांगितले. संपूर्ण बहुजन समाजाने एकत्रित येऊन लढण्याची आवश्यकता मा. प्रा. ए. पी. चौधरी यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली. अमित मेधावी यांनी प्रास्ताविक व त्यानंतर लेखक डॉ. प्रकाश कांबळे यांनी लेखकीय भूमिका विशद केली. यावेळी लेखकाच्या आई गंगाबाई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. एच. व्ही. चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. माधव पाटील यांनी मानले. हा समारंभ झूम आणि फेसबुकवरही लाईव्ह करण्यात आला.