मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात
By Admin | Updated: August 25, 2014 14:41 IST2014-08-25T14:41:38+5:302014-08-25T14:41:38+5:30
चोपडा तालुक्यातील कठोरा येथील सरला समाधान कोळी (२३) या गर्भवती महिलेला क्षुल्लक कारणावरून चार जणांनी केलेल्या मारहाणीमुळे गर्भपात झाला.

मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात
जळगाव : चोपडा तालुक्यातील कठोरा येथील सरला समाधान कोळी (२३) या गर्भवती महिलेला क्षुल्लक कारणावरून चार जणांनी केलेल्या मारहाणीमुळे गर्भपात झाला. --------- शेजारी राहणारा ईश्वर हा विजेच्या खांबावर आकडा टाकत असताना स्पार्किंग झाले. त्यामुळे सरला व ईश्वर यांच्यात वाद झाला. शाब्दिक वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. शेजारी ईश्वर, त्याची पत्नी, मुलगा व मुलीने सरला यांना मारहाण केली. |