जळगाव : दहावीच्या परीक्षत जळगाव जिल्ह्याचा निकाल ७६़९२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा ११ टक्क्यांनी घसरण झाली आहे़पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमधील अबोली दादाभाऊ मांडगे ही ९८.८० टक्के गुण मिळवून अव्वल ठरली आहे़यंदा टक्यांंच्या घसरणसोबतच शंभरी गाठलेल्या शाळांची संख्यासुध्दा कमी झाली आहे. जळगाव शहरातील तीनच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे़
दहावी परीक्षेत जळगाव जिल्ह्यात अबोली मांडगे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:59 IST