घरकुलांच्या वसुलीसाठी अभय योजना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:41+5:302021-05-18T04:17:41+5:30

जळगाव - महापालिकेच्या घरकुलांमध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांनी महापालिकेचा भाड्यापोटी ची रक्कम अजूनही भरलेले नाही. घरकुल धारकांकडे महापालिकेचे ...

Abhay Yojana for recovery of households? | घरकुलांच्या वसुलीसाठी अभय योजना ?

घरकुलांच्या वसुलीसाठी अभय योजना ?

जळगाव - महापालिकेच्या घरकुलांमध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांनी महापालिकेचा भाड्यापोटी ची रक्कम अजूनही भरलेले नाही. घरकुल धारकांकडे महापालिकेचे 15 कोटी थकीत असून, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात महापालिकेने मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यासाठी अभय योजना राबवली होती. आता ही योजना घरकुल धारकांकडे असलेल्या थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी राबवण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनपा कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्या

जळगाव- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मनपा कर्मचारी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र काम करत असून, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची होण्याची शक्यता असते. तसेच दुर्दैवाने यामध्ये कोणता कर्मचारी दगावला र संबंधित कर्मचार्‍याचा कुटुंबावर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मनपा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाकडून करण्यात आली आहे. तसेच याबाबत महापौर जयश्री महाजन यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

प्रभाग २ मध्ये नालेसफाई ला सुरुवात करा

जळगाव - शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील चौगुले प्लॉट, व हरीओम नगर रेल्वे लाईन जवळ परिसरातील नाल्याचे संरक्षण भिंत बांधताना मोठ्या प्रमाणात दगड-माती वेस्ट मटेरियल पडलेले आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे. पावसाळा सुरू होण्या आधी नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या पाण्यामुळे नाल्याचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात घुसून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नालेसफाई ला सुरुवात करावी अशी मागणी नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी केली असून, याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: Abhay Yojana for recovery of households?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.