अभाणपूरला वीज पडून तीन घोडे ठार
By Admin | Updated: May 18, 2014 01:15 IST2014-05-18T01:15:44+5:302014-05-18T01:15:44+5:30
शिरपूर : तालुक्यातील बहुसंख्य गावांना आज वादळी पावसाने तडाखा दिला. अभाणपूर येथे वीज कोसळून मेंढपाळाचे तीन घोडे जागीच ठार झाले.

अभाणपूरला वीज पडून तीन घोडे ठार
शिरपूर : तालुक्यातील बहुसंख्य गावांना आज वादळी पावसाने तडाखा दिला. अभाणपूर येथे वीज कोसळून मेंढपाळाचे तीन घोडे जागीच ठार झाले. बभळाज येथे वादळामुळे झाडे मोडून पडले. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. झेंडेअंजन येथे विजेचे पाच खांब उन्मळून पडले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला. बभळाज परिसरातील बहुसंख्य गावांना दुपारच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे तसेच चार्याचे अतोनात नुकसान झाले आहे. वडगाव, ता.शहादा येथे वीज पडून दोन बैल ठार झाले.